BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : क्रांतीज्योती सावित्रीबाई जयंतीनिमित्त नवले महाविद्यालयात पालक सभा

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- कुसगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कुसगाव येथील सिंहगड इन्स्टिट्युटच्या नवले महाविद्यालयात बीकॉम, बीबीए, बीसीए व एमकॉमच्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या विकासासंबंधी पालक व महाविद्यालय यांच्या समन्वयाने विद्यार्थी विकास साधला जातो या भूमिकेतून या पालक सभेचे नियोजन करण्यात आले होते.

यावेळेस विभाग प्रमुख डॉ. उर्मिला पाटील, डॉ. दीपाली मानकर व प्रा.निर्मला शिंगे यांनी महाविद्यालय राबवित असलेल्या सर्व उपक्रमांची माहिती पालकांना दिली. तसेच पालकांचे शंकासमाधान केले. प्राचार्य डॉ.जयवंत देसाई यांनी बँकिंग रिक्रुटमेंट संबंधी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना अनेक नोकर्‍यांच्या संधी उपलब्ध असल्याने अशा प्रकारचे प्रयत्न महाविद्यालय करणार असल्याचे प्रतिपादन केले.

तसेच उपलब्ध इन्फ्रास्ट्रक्चर जागतिक दर्जाचे असून प्रशिक्षित प्राध्यापक वर्ग यासंबंधी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या सभेचे संयोजन प्रा. डॉ.नितीन जोशी यांनी केले. प्राचार्य डॉ.इनामदार (संचालक,सिबाका) यांनीही पालकांशी संवाद साधला. या कार्यक्रमाप्रसंगी माजी विद्यार्थी संघटनेचे यश सोनवणे यांनी आपले अनुभव कथन करून महाविद्यालयामध्ये आम्ही कसे घडलो याबद्दल विवेचन केले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.ईकबाल हवलदार व इतर प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.

HB_POST_END_FTR-A4

.