Chikhli : कुदळवाडीच्या महापालिकेच्या शाळेमध्ये आठवी ते दहावीचे वर्ग चालू करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – कुदळवाडी येथील महापालिकेच्या शाळेमध्ये इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग सुरु करण्याची मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सभापती सोनाली गव्हाणे यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मौजे टाळगाव चिखली, या भागात नागरीवस्ती मोठया प्रमाणात आहे.या भागातील कुदळवाड येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची शाळा क्रमांक 89 कुदळवाडी या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग चालू आहे. याठिकाणी गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

कुदळवाडी मनपा शाळा येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका फ प्रभाग स्थापत्य विभागाकडून माध्यमिक शाळेकरिता नवीन इमारत बांधण्याचे काम सुरु आहे. हे काम तीन ते चार महिन्याच्या कालावधीत पूर्ण होणार आहे. तोपर्यंत या विद्यार्थ्यांना दुस-या शाळेमध्ये जावे लागते. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांकरिता इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग माध्यमिक शिक्षण विभागाकडून चालू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.