Chinchwad : अश्लील व्हिडिओ क्लिपच्या आधारे ब्लॅकमेल करत महिलेकडे एक लाख रुपयांची मागणी

एमपीसी न्यूज – महिलेच्या मर्जीविरोधात तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. शारीरिक संबंधांची व्हिडिओ क्लिप काढली. त्या आधारे महिलेला ब्लॅकमेल करीत एक लाख रूपयांची मागणी केली. ही घटना उल्हासनगर आणि चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने अंबरनाथ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा गुन्हा रविवारी (दि. 13) चिंचवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार विश्वनाथ वाल्हे (रा. दर्शन नगरी, चिंचवडगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना उल्हासनगर-ठाणे आणि चिंचवड येथे 21 नोव्हेंबर 2018 ते 9 जानेवारी 2019 दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विश्वनाथ याने फिर्यादी महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच शारीरिक संबंधांची तिच्या नकळत व्हिडिओ क्लीप काढली. आरोपी आणि पीडित महिला यांच्यात झालेला संवाद पतीला दाखविण्याची धमकी दिली. एक लाख रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास शारीरिक संबंधाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत महिलेने पोलिसात गुन्हा नोंदवला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.