Nigdi: प्राधिकरण येथे भरदिवसा घरफोडी करत सहा लाखांचे सोने लंपास

एमपीसी न्यूज – भरदिवसा घराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातून 5 लाख 97 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 14) जीपीआरए कॉलनी प्राधिकरण निगडी येथे सकाळी सव्वा नऊ ते दुपारी साडेचार या कालावधीत घडली.

डी जेसुबालन (वय 34, रा. फ्लॅट नंबर 37, जीपीआरए कॉलनी प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेसुबालन यांचे घर सोमवारी सकाळी सव्वानऊ ते दुपारी साडेचार या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले 119 ग्रॅम वजनाचे 5 लाख 97 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन आरोपी पसार झाले. फिर्यादी साडेचार वाजता घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.