Pune : पुण्यात चार दिवसात पाच खून; कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

एमपीसी न्यूज- मागील चार दिवसात पुणे शहरात खुनाच्या पाच घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एक खून भोर तालुक्यात झाला तर चार खून पुण्यात झाले. त्यामुळे पुण्यात खरच कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे का ? हा प्रश्न निर्माण झाला.

आज (बुधवारी) हडपसर परिसरात मामानेच दारूच्या नशेत भाच्याचा खून केला. संपत उडदे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दारू पिऊन झालेल्या किरकोळ वादातून हा खून झाला. खून केल्यानंतर आरोपी पळून गेला आहे.

दुसरा खून झाला पुण्यातील सिंहगड रस्त्यावर. सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखाली असलेल्या बंदिस्त पाईपलाईनच्या खोल खड्ड्यात एका ३० वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह टाकल्याचे आढळले. यातील मृतांची ओळख अद्याप पटली नाही.

तिसरी घटना हडपसर परिसरात घडली. उसने पैसे परत मगितल्यामुळे राहुल पाटील या युवकाचा कोयत्याने घाव घालून खून करण्यात आला. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटकही केली आहे.

चौथ्या घटनेत सराईत गुंडांच्या दोन टोळ्यात एका सराईताची हत्या करण्यात आली. निलेश वाडकर असे या गुन्हेगारांचे नाव आहे. जनता वसाहत येथील गल्ली क्रमांक ३ मध्ये गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्व वादातून ही घटना घडली.

पाचव्या घटनेत पुण्यातील ६० वर्षीय उद्योजक रिकबचंद रायचंद ओसवाल यांचा मृतदेह भोर तालुक्यातील एका गावात आढळला. खून करून, हात पाय बांधून त्यांचा मृतदेह भोर तालुक्यातील शिळीम गावात टाकला होता. ओसवाल हे चार दिवसांपासून बेपत्ता होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.