Nigdi : महापौरांच्या हस्ते सुवर्णपदक विजेत्यांचा, योगशिक्षकांचा सत्कार

एमपीसी न्यूज – पुणे डिस्ट्रीक्ट योगा अँड फिटनेस इन्स्टिट्यूट ज्ञानप्रबोधिनी यांच्या वतीने महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्यांचा व योग शिक्षक पदवी उत्तीर्ण शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

निगडी, ज्ञानप्रबोधिनी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला इंडियन टीम कोच, कॅप्टन चंद्रकांत पांगारे, संदीप भंडारी, मनोज पाटील, विद्या महाले आदी उपस्थित होते. योगा फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने पंजाब येथे 43 व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये सुशांत तरवडे, देवदत्त भारदे, स्वरदा देशपांडे, श्रेया कंधारे या चार योगपटुंनी एकून 5 सुवर्णपदकांची कमाई केली. तसेच विश्वरूपा चटर्जी हिने 35 वर्षापुढील गटामध्ये कांस्यपदक मिळवले. या सर्व विजेत्यांचे पुष्पगुच्छ व भेट देऊन महापौर जाधव यांनी सत्कार करून अभिनंदन केले. दुबई येथे होणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

पुणे डिस्ट्रीक्ट योगा अँड फिटनेस इन्स्टिट्यूट ज्ञानप्रबोधिनी यांच्या मार्फत महाराष्ट्र योगा असोसिएशनच्या मान्यतेने योग शिक्षक पदविका हा पंधरा महिन्यांचा कोर्स चालवला जातो. या मध्ये योग प्रारंभ, योग प्राथमिक, योग वित्त व योग शिक्षक या चार कोर्स चा समावेश आहे. आत्ता पर्यंत 55 साधक योग प्रारंभ, 15 साधक योग प्राथमिक (2) तर दया आंद्रे, अनिता गायकवाड व शुभांगी मोरे हे साधक योग वित्त (3) ही परीक्षा उत्तीर्ण होऊन फेब्रुवारी मध्ये प्रथम योग महापौरांच्या हस्ते राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्यांचा व योगशिक्षक पदवी उत्तीर्ण योग शिक्षकांचा सत्कार शिक्षक होण्याचा मान मिळवणार आहेत.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगपटूंनी जागतिक दर्जावरील सर्वात अवघड व अति अवघड आसनांचे सादरीकरण महापौरांच्या समोर केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मार्चमध्ये महापौर चषकाचे आयोजन करा, मी सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन महापौर जाधव यांनी यावेळी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.