Pune : रोटरी न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर’ चे उद्घाटन

एमपीसी न्यूज- मज्जा संस्थेशी निगडित अर्धांगवायू आणि इतर आजारांवर उपचार आणि रुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त ‘रोटरी न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर’ ची स्थापना हडपसर येथील सहयाद्री हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. या सेंटरचे उद्घाटन शनिवारी (दि. 19) झाले.
‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन ‘ने यासाठी पुढाकार घेतला असून 40 लाख खर्चून अत्याधुनिक यंत्रणा उभारली आहे.

बायोडेक्स बॅलन्स सिस्टिम, बायोडेक्स सीट टू स्टँड ट्रेनर, पाब्लो सिस्टिम, इन्फ्रारेड लेझर थेरपी, मॅट्रीक्स रिदम थेरपी, लिव्हा को- ऑर्डिनेशन डायनॉमिक थेरपी मशीन अशी उपचार सामग्री पुण्यात प्रथमच उपलब्ध झाली आहे .रुग्णांना सवलतीच्या दरात या सुविधा उपलब्ध होतील .

रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल डॉ .शैलेश पालेकर यांच्याहस्ते सेंटरचे उद्घाटन झाले. माजी प्रांतपाल अभय गाडगीळ, सह्याद्री हॉस्पिटल ग्रुपचे अध्यक्ष डॉ चारुदत्त आपटे, रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन’च्या अध्यक्ष अमृता देवगावकर, माजी अध्यक्ष गणेश जाधव, गिरीश मठकर, डॉ.रोहिणी डांगे, उपस्थित होते.

रोटरी डिस्ट्रिक्ट 3131, 3800 रोटरी क्लब आकुर्डी ,रोटरी क्लब पाषाण ,रोटरी क्लब लक्ष्मी रोड यांनी या प्रकल्पात ग्लोबल ग्रांट पार्टनर म्हणून सहकार्य केले आहे. सुनील बर्वे यांनी आभार मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.