Talegaon Dabahde : नाट्यवाचन स्पर्धेत डी.आय.सी.स्कुल, कलाध्यास व कलाप्रेमी यांचे यश

कलापिनी व अ. भा. मराठी नाट्यपरिषद तळेगावतर्फे आयोजन

एमपीसी न्यूज- तळेगाव येथील कलापिनी व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित नाट्यवाचन स्पर्धेमध्ये सांघिक शालेय गटामध्ये डी.आय.सी.स्कुल निगडी, सांघिक शिक्षक गटामध्ये कलाध्यास निगडी व खुल्या सांघिक गटामध्ये कलाप्रेमी चिंचवड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ही नाट्यवाचन स्पर्धा मावळ, खेड, पिंपरी-चिंचवड विभागातील शालेय, शिक्षक व खुल्या विभागातील स्पर्धकांच्या प्रचंड उत्साहात संपन्न झाली. तिन्ही विभागात एकूण 43 संघांनी सहभाग घेतला.

प्राथमिक फेरीचे परीक्षण विद्याधर पुराणिक,विशाखा बेके, स्नेहलता घाटगे, डॉ.स्वाती वेदक, कांचन सावंत व सुहास जोशी यांनी केले तर अंतिम फेरीसाठी अशोक अडावदकर (चिंचवड), प्रिया रहाळकर (लोणावळा) नागेश नेहरे (मुंबई) यांनी परीक्षण केले.

शालेय, शिक्षक आणि खुल्या गटांच्या अंतिम फेरीनंतर संघाच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेला परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात सर्व संघांच्या सादरीकरणा विषयी सखोल चर्चा झाली या परिसंवादाचे संचालन अंजली सहस्त्रबुद्धे यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभासाठी थापाड्या चित्रपटाच्या नायिका मानसी मुसळे, स्पर्धा संयोजक अशोक बकरे व कलापिनीच्या उपाध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी प्रास्ताविक केले व स्पर्धेला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादा बद्दल स्पर्धकांना धन्यवाद दिले.

या स्पर्धांच्या यशस्वी संयोजनामध्ये मुकुंद इनामदार, रश्मी पांढरे, विनायक काळे, चेतन पंडित, आदित्य धामणकर, चैतन्य जोशी, सायली रौन्धळ, तेजस्विनी गांधी, रामचंद्र रानडे, विश्वास देशपांडे आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल

शालेय गट –

सांघिक प्रथम – “आनंदी शाळा” डी.आय.सी.स्कुल निगडी
सांघिक द्वितीय – “रस्सी” धनीराज इंग्लिश स्कुल वाकड
सांघिक तृतीय – “सूर जुळले” सरस्वती विद्यामंदिर तळेगाव
दिग्दर्शन प्रथम – वैभवी तेंडूलकर (रस्सी)
दिग्दर्शन द्वितीय- संगीता कुलकर्णी (आनंदी शाळा)
लेखन -वैभवी तेंडूलकर ( रस्सी)
नाट्य रुपांतर- मानसी आपटे (फुट प्रिंट्स)

अभिनय मुले – प्रथम- सिराज साळवे, द्वितीय-स्वप्नील ठोंबरे, तृतीय – सिद्धेश्वर पोतदार,
उत्तेजनार्थ-अमान दलाल, अभय सरगर, किशोर

अभिनय मुली- प्रथम-श्रुती तारे, द्वितीय-अनघा फाटक, तृतीय- मीरा बेळगीकर
उत्तेजनार्थ – मानसी जंगले,जिया कुरेशी,तनया शार्दुल.

विशेष अभिनय
प्राथमिक फेरी-अनुष्का अरगडे, तन्वी गायकवाड, कादंबरी ठाकूर, स्वरांगी गाडेकर, चित्रांषु तापस.

शिक्षक विभाग –

सांघिक प्रथम-“बंद दरवाजा” (कलाध्यास – निगडी)

सांघिक द्वितीय- “चंगतम” (सिटी प्राईड निगडी)

सांघिक तृतीय- “आमचा गणपती उत्सव” – (साईनाथ बालक मंदिर)

उत्तेजनार्थ – जेंव्हा तायडी बदलते (पोतदार इंग्लिश स्कुल), खिडकी (धनीराज स्कुल वाकड)

दिग्दर्शन प्रथम -शोभा जोशी (बंद दरवाजा),

दिग्दर्शन द्वितीय – शिल्पा जोगळेकर (चंगतम)

लेखन- निशा बेलसरे (आमचा गणपती उत्सव), मेघना वीरकर (मोकळा श्वास)

नाट्य रुपांतर- अलकनंदा वाडेकर (बंद दरवाजा), वैभवी तेंडूलकर (खिडकी)

अभिनय महिला- प्रथम- शोभा जोशी ( बंद दरवाजा), द्वितीय -अलकनंदा वाडेकर (बंद दरवाजा), तृतीय – विनिता देपोळकर

उत्तेजनार्थ – स्वाती कुलकर्णी, माया सोनावणे,हर्ष क्षिरसागर.

अभिनय पुरुष- कमलेश गुजर

विशेष अभिनय प्राथमिक फेरी – केतकी लिमये, अपुर्वा भोपळे, अतुल थोरात,अमृता मुके,

खुला विभाग –

सांघिक प्रथम -“डेड ओन ड स्पॉट” (कलाप्रेमी चिंचवड)

सांघिक द्वितीय – “माझी आई रां…” (कलाकार २ चिंचवड)

सांघिक तृतीय- “पाहुणचार” – (कलाकार २ चिंचवड )

उत्तेजनार्थ – “होय साहेब” (खयाल तळेगाव ),भूमिकन्या सीता (शब्द संपदा तळेगाव),

न येती उत्तरे (तालीम देहू गाव)

दिग्दर्शन प्रथम -अनिकेत नेमाणे ( माझी आई रां….)

दिग्दर्शन द्वितीय – रुद्राणी नाईक (देडे ओन द स्पॉट)
लेखन –ओंकार गिजरे.
नाट्य रुपांतर – सुरज राजे जाधव
अभिनय महिला – प्रथम –रुद्राणी नाईक (डेड ओन द स्पॉट),द्वितीय- मानसी कुलकर्णी, तृतीय- विनया परांजपे (भूमिकन्या सीता)
उत्तेजनार्थ- प्रियांका शेटे

अभिनय पुरुष- प्रथम- प्रसन्न कुलकर्णी, द्वितीय- अनिकेत नेमाणे, तृतीय- सुरज राजे जाधव

विशेष अभिनय प्राथमिक फेरी- संजय मालकर, ज्योती गोखले, विराज सवाई, चैतन्य जोशी, समीर नरवडे, सायली रौंधळ,शेखर गानू, श्रीपाद भिडे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.