Pune : कात्रज येथील वंडरसिटीजवळील झोपड्याना आग

एमपीसी न्यूज- कात्रज येथील वंडरसिटीजवळील झोपड्याना आग लागल्याची घटना आज, शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आली आहे. येथील झोपड्या पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हटवण्याचे काम सुरु असताना ही घटना घडली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र येथील झोपडी धारकांनीच या झोपड्या पेटवून दिल्याचे बोलले जात असून झोपीधारकांनी मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच झोपड्या पेटवून दिल्याचा आरोप केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.