Pimpri: डॉ. आंबेडकर मिनी मार्केटप्रश्‍नी रामदास आठवले यांना निवेदन

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील बहुजन प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्ट आणि त्याठिकाणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिनी मार्केटच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी ट्रस्टच्या पदाधिका-यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मुंबईतील संपर्क कार्यालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध मागण्यांचे निवेदन आठवले यांना देण्यात आले.

या शिष्टमंडळाशी मागण्यांविषयी चर्चा केल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून चर्चा केली. तसेच या मागण्या सोडविण्याचे लेखीपत्र शिष्टमंडळामार्फत महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहे. या प्रलंबित मागण्यांसाठी या पदाधिका-यांनी उपोषण सुरू केले होते.

या शिष्टमंडळामध्ये समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रफिक शेख, महाराष्ट्र मजूर पक्षाचे अध्यक्ष भाऊसाहेब अडागळे, बहुजन प्रेरणा बुद्ध समाजिक ट्रस्ट व मार्केटचे अध्यक्ष फारुखभाई कुरेशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रस्टचे मार्गदर्शक बळीराम काकडे, सुरेश मिसाळ, कादीर कुरेशी व गौस कुरेशी यांचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.