BNR-HDR-TOP-Mobile

Pune : अमित शहा 9 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येणार

136
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सगळ्याच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा देखील आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी 9 फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते पुणे, बारामती, शिरूर या तीन मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा पैकी जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर शिवसेनेबरोबर युती करण्याचे प्रयत्न देखील सुरु आहेत. युती नाही झाली तरी सुद्धा स्वबळावर जास्त जागा आणण्यासाठी व्यूहरचना तयार करण्यात येते आहे. अमित शहा हे स्वाइन फ्लूची लागण झाल्यामुळे आजारी पडले होते. आजारातून बाहेर पडल्यानंतर अमित शहा यांनी पश्चिम बंगाल नंतर महाराष्ट्राकडे आपला मोर्चा वळवला आहे. ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत बुथ प्रमुखांना आगामी निवडणुकीसाठी मार्गदर्शन करणार आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.