Pimpri : टाटा मोटर्स पुणे प्लांटने पटकावले ‘बेस्ट ऑफ बेस्ट ऑर्गनायझेशन’ आणि ‘मॅक्झिमम पार्टिसिपेशन’ हे दोन मानाचे पुरस्कार

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्स कमर्शिअल व्हेइकलच्या जमशेदपूर, पुणे, लखनऊ, पंतनगर आणि धारवाड प्लांटने 29 व्या इनसान नॅशनल कन्व्हेंशनमध्ये 22 विभागात 74 पुरस्कार पटकावले. पुण्यातील टाटा मोटर्स प्लांटने ‘बेस्ट ऑफ बेस्ट ऑर्गनायझेशन’ आणि ‘मॅक्झिमम पार्टिसिपेशन’ हे दोन मानाचे पुरस्कार पटकावले.

इंडियन नॅशनल सजेशन स्किम्स असोसिएशनतर्फे (इनसान- INSSAN) पुण्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदाच्या परिषदेची संकल्पना होती ‘एंगेज – मोटिव्हेट-इम्पलांट म्हणजेच सहभाग-प्रोत्साहन-अंमलबजावणी यासाठी स्मार्ट पद्धतींचा वापर करून व्यवसायात उत्कृष्टता आणण्यासाठी ईएमआय’. ही संकल्पना व्यवसायासाठी अगदी सुयोग्य अशीच होती. कर्मचाऱ्यांचा सहभाग, प्रयोगशीलता आणि विविध क्षेत्रांमध्ये सध्या चलती असलेल्या सजेशन स्कीमसारख्या कार्यक्रमांची अंमलबजावणी या आधारे कंपन्यांच्या यशाला अधोरेखित करणे आणि त्यांचा सन्मान करणे यासाठी इनसान एक व्यासपीठ पुरवते.

टाटा मोटर्सच्या सुमारे 100 प्रतिनिधींनी आणि एमअँडएम, बीएचईएल, बीईएल, आरसीएफ आणि टीव्हीएस मोटर्स यांसारख्या कंपन्यांच्या 250 हून अधिक प्रतिनिधींनी या परिषदेला हजेरी लावली. कमर्शिअल व्हेइकल आणि प्रवासी वाहन विभागात टाटा मोटर्सला 110 हून अधिक विभागांमध्ये नामांकन होते. कमर्शिअल व्हेइकल बिझनेस युनिटने (सीव्हीबीयू) आजवरचे सर्वाधिक म्हणजेच 74 पुरस्कार पटकावले. यात चार सर्वोच्च सांघिक पुरस्कारांचा समावेश आहे.

व्यवसायाच्या पलिकडेही काही पुरस्कार देण्यात आले. यात पुढील विभागात पहिला क्रमांक कंपनीने पटकावला: ·’बेस्ट एक्झिबिट’चा पुरस्कार टाटा मोटर्स पंतनगर प्लांटला टाटा मोटर्स लखनऊला निबंधासाठी पुरस्कार,·टाटा मोटर्स जमशेदपूरला कविता आणि घोष वाक्यासाठी पुरस्कार, पोस्टर आणि बेस्ट इव्हॅल्युएटर विभागात टाटा मोटर्स पुणे सीव्हीबीयूला पुरस्कार प्राप्त झाले.

टाटा मोटर्सच्या कमर्शिअल व्हेइकल बिझनेस युनिटच्या उत्पादन विभागाचे प्रमुख अजोय लाल म्हणाले, “या वर्षाची सुरुवात फारच छान झाली आहे. अतुलनीय कौशल्य, प्रयोगशीलता आणि बांधिलकीचे अप्रतिम प्रदर्शन करणाऱ्या टीम्सचा आम्हाला अभिमान आहे. सर्व विजेत्यांचे मी अभिनंदन करतो आणि यापुढेही ‘बेस्ट ऑफ बेस्ट ऑर्गनायझेशन’ ही आमची ओळख कायम राहील,अशी आशा आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.