Nigdi : नंदकिशोर कल्चरल सोसायटीतर्फे पं. रामलाल बारेथ व मथुरादेवी यांना विमल भास्कर पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्यावतीने यावर्षीचा विमल भास्कर पुरस्कार छत्तीसगढचे प्रसिध्द कथक गुरु पं. रामलाल बारेथ व मथुरादेवी यांना जाहीर झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

हा पुरस्कार निगडी येथील नंदकिशोर कल्चरल सोसायटी येथे दि. 3फेब्रुवारीला सायंकाळी सात होणार आहे. पुरस्काराचे स्वरुप पंचवीस हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे. विमल कपोते व भास्कर कपोते यांच्या नावाने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी हा पुरस्कार विविध क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या कामगिरीबद्दल दिला जातो.

यापूर्वी हा विमल भास्कर पुरस्कार कथकक्वीन सितारादेवी, पद्ममविभूषण पं. बिरजूमहाराज, पं. शाश्वती सेन यांना गौरविण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.