Pune : दोन कारची समोरासमोर धडक होऊन एक ठार चार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- टोयोटा आणि आय 20 कारची समोरासमोर धडक बसून एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चारजण गंभीर जखमी झाले.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी (दि. 4) मध्यरात्री सोरतापवाडी गावाजवळ हा अपघात झाला.

अमोल रोहिदास काटे (वय 32) असे मृत युवकाचे नाव आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टोयोटा आणि आय 20 कार एकमेकांना धडकल्या. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.