Pune : ‘वाड़मयचौर्य ‘ विषयावर रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये कार्यशाळा

एमपीसी न्यूज- ‘वाड़मयचौर्य ‘ ( प्लगरिझम )विषयावर महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार झालेल्या या कार्यशाळेत संशोधक, तज्ज्ञ, प्राध्यापक सहभागी झाले होते. ए.के.के. न्यू लॉ अॅकॅडमीच्या प्राध्यापक जेसिंटा बॅस्टियन यांनी मार्गदर्शन केले. संशोधन, लेखनात होत असलेल्या वाड़मयचौर्याच्या धोक्यांची, परिणामांची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली. एम.ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्य अनिता फ्रांझ, ग्रंथपाल चंदा सुपेकर उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.