Pimpri : भाजप नगरसेविकेने शिक्षणाबाबत खोटी माहिती दिल्याची ‘सीएम’कडे तक्रार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेविका जयश्री गावडे यांनी त्यांचे शालेय शिक्षण आठवी नापास असताना महापालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्जात शिक्षण दहावी उत्तीर्ण दाखवले आहे. नगरसेविका गावडे यांनी महापालिका आणि निवडणूक आयोगाला चुकीची माहिती देऊन फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आशिष गावडे यांनी केली आहे.

या सदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते आशिष गावडे यांनी निवेदन दिले आहे. सन 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत जयश्री गावडे या चिंचवड प्रभाग क्रमांक 19 आनंदनगर, भाटनगरमधून भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत.

गावडे यांचे शालेय शिक्षण आठवी नापास आहे. त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात आठवी नापास असा उल्लेख आहे. मात्र, निवडणुकीतील उमेदवारी अर्जात त्यांनी शिक्षण दहावी उत्तीर्ण दाखवले आहे. नगरेसविका गावडे यांनी महापालिकेसह सरकारला चुकीची माहिती देऊन फसवणूक केली आहे. त्यामुळे गावडे यांची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावडे यांनी निवेदनातून केली आहे.

‘ज्यांच्याकडे तक्रार केली आहे. ते चौकशी करुन ठरवतील काय करायचे ते’ असे सांगत नगरसेविका जयश्री गावडे यांनी याबाबत अधिक भाष्य करण्याचे टाळले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.