Chinchwad : प्रतिभा जॉब फेअरला विक्रमी प्रतिसाद

एमपीसी न्यूज- कारखानदारीत नोकरदारीची असलेली गरज शिक्षण संस्थांच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी प्रतिभा इन्स्टिट्यूटने मोलाची दिशादर्शक कामगिरी केली आहे. राज्य व केंद्र सरकारने याची दखल घेऊन मोठ्या प्रमाणावर जॉब फेअर भरविण्यासाठी भविष्यात मदत करावी, असे मत माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी व्यक्त केले.

उदघाटन सोहळ्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य राजेश पांडे, परिमंडल एकच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, लायन्स क्लबचे प्रान्तपाल रमेश शहा, जॉब फेअरचे स्वागताध्यक्ष व संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, संचालिका भूपाली शहा, एमएचआरडी चे सचिव अमन राजावली शिवाजी विद्यापीठातील प्लेसमेंट विभागाचे डॉ. गजानन राशिनकर, अघिष्ठता ए.एम. गुरव, FUEL चे संस्थापक अनुज वी. प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, डॉ. राजेंद्र कांकरिया, प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, संचालक डॉ. सचिन बोरगावे, डॉ. जे.डी. टाकळकर, डॉ. के.आरपाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या प्रांगणात प्रारंभ झालेल्या दोन दिवसीय जॉब फेअरला नोकरीच्या उत्तम संधी शोधणाऱ्या नवख्या आणि अनुभवी अशा उमेदवारांचा उत्साही प्रतिसाद मिळाला आहे.

कृष्णराव भेगडे म्हणाले, “सुशिक्षित बेरोजगार पदवीधरांसाठी तसेच इतर क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी जॉब फेअरचा उपक्रम कौतुकास्पद बाब आहे. राज्य व केंद्र सरकारने याची दखल घेवून मोठ्या प्रमाणावर जॉब फेअर भरविण्यासाठी मदत करावी, असे सांगून आजची शिक्षण पदतीत अमूलाग्र बदल व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली”

पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या, “आज गुन्हेगारी क्षेत्रात 18 ते 25 वयोगटातील युवकांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे.
त्यांच्यावर एकदा गुन्हा दाखल झाला तर, त्या युवकाचे आयुष्य उध्वस्त होते.यासाठी युवकांनी चुकीच्या मार्गाने जाता कामा नये. संघर्षाशिवाय जीवनात कोणालाच यश मिळविता येत नाही. क्षेत्र कोणतेही असो. यश मिळविण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. जॉब फेअरसाठी जमलेले युवक नशिबवान आहेत. कारण, प्रतिभा इन्स्टिट्युट हा उपक्रम विनामूल्य घेत आहे ”

राजेश पांडे म्हणाले, ” भारत देशात आज एकूण लोकसंख्येपैकी 80 कोटी युवकांची संख्या असून, जगात सर्वात जास्त युवा शक्तिचा देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. देशात प्रचंड बेरोजगारी वाढत आहे. असे असले तरी होतकरू युवकांना जगभरात रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध आहेत.

जॉब फेअरचे स्वागताध्यक्ष तथा संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, “जॉब फेअरसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनला 14 हजार 208  जणांनी रजिस्ट्रेशन केले. ऑफलाईन देखील संख्या आज येथे मोठ्याप्रमाणात आहे. 218 कंपन्यांचा यात सहभाग असून, 15 हजार नोकया या जॉब फेअरच्या माध्यमातून विविध क्षेत्रात मिळणार आहे ज्यांना नोकऱ्या मिळणार नाही, त्यांना प्रतिभा महाविद्यालय व फ्युएल कंपनीच्या संयुक्त विद्यमाने युवकांशी संपर्क साधून त्यांना नोकरी मिळण्यासाठी विविध स्तरावर मार्गदर्शन करणार आहे. आपण समाजाचे देणे आहोत, या सामाजिक जाणिवेतून सदर उपक्रमाचे आयोजन निःशुल्क केले आहे”

या जॉब फेअरमध्ये बजाज ऑटो, टेक महिंद्रा, थरमॅक्स, रिलायन्स, एअरटेल, जयहिंद इंडस्ट्रिज, बॉश कंपनी, टाटा केमिकल, इन्फोसिस, बॉम्बे स्टॉक एक्रॉज आदी कंपन्यांचा सहभाग असून कलकत्ता, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, देवगड, ठाणे, मुंबई. लोणावळा पुणे जिल्ह्यातील युवक युवतींनी नोकरीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्या डॉ. बनिता कुऱ्हाडे यांनी तर आभार डॉ. जयश्री मुळे यांनी मानले. जॉब फेअर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा. हर्षिता वाच्छानी, प्रा. गुरुराज डांगरे, प्रा. हनुमंत कोळी, प्राध्यापिक स्पाली प्रभुगावकर, विशेष परिश्रम घेत आहेत. शिवाजी विद्यापीठ, पुणे फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जीलिंग लाईव्हस आणि लायन्स क्लब तळेगाव या संस्था जॉय फेअरचे सहप्रायोजक आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.