PimpleSaudagar : उन्नती सोशल फौंडेशन मार्फत मोफत “विठाई ” वाचनालय

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फौंडेशन मार्फत पिंपळे सौदागर येथील वाचकांसाठी ” विठाई ” मोफत वाचनालयाची स्थापना केली . यामध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी अशी मिळून तब्बल 1500 पेक्षा अधिक पुस्तके उपलब्ध केली आहेत. याप्रसंगी वाचनालयाचे उदघाटन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.

यावेळी पिंपळे सौदागर प्रभागाचे नगरसेवक शत्रूघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, उन्नती सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे, विठाई वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष पवार, डॉ . गिरीश प्रभुणे, प्रदीप कदम, यशदा रिऍलिटी ग्रुपचे चेअरमन वसंत काटे, ग्रॅव्हिटी लॅन्डमार्क्सचे चेअरमन राजू भिसे, विजय भिसे, आनंद हास्य क्लबचे सर्व सभासद, ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनचे सर्व सभासद, नवचैतन्य हास्य क्लबचे सर्व सभासद, पिंपळे सौदागर येथील सर्व भजनी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

सूत्रसंचालन विजय बोत्रे -पाटील यांनी केले. नवचैतन्य हास्य क्लबचे सदस्य राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.