BNR-HDR-TOP-Mobile

Pune : डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून एकाचा खून

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- पद्मावती परिसरातील वीर लहुजी सोसायटीत एकाचा डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री घडली.

मोहन शिवाजी गायकवाड (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली.

तुळशीराम पाटोळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून राकेश पाटोळे आणि गणेश वैराट (सर्व रा. वीर लहुजी सोसायटी, पद्मावती) यांचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि मोहन गायकवाड काही दिवसांपूर्वी कोल्हापूरला एकत्र गेले होते. तेथे त्यांच्यात काही वाद झाला होता. त्यानंतर ते बुधवारी सकाळी परत आले. त्यानंतर संध्याकाळी मोहन गायकवाड हा सोसायटीत उभा असताना आरोपी त्या ठिकाणी आले आणि आरोपी राकेश पाटोळे याने माझ्या बायकोला शिवीगाळ का केली? असा जाब विचारला. यावरून त्यांच्यात परत भांडण झाले.

तिघांनी मिळून मोहन गायकवाड याला बेदम मारहाण केली तर एकाने त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला आणि तिघेही पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहनला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले परंतु उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाला.

HB_POST_END_FTR-A2

.