BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : शाळेत झालेल्या भांडणावरून चौघांना मारहाण

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयात झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी चौघांना लोखंडी रॉड आणि काठीने मारून जखमी केले. ही घटना जाधववाडी, चिखली येथे बुधवारी घडली.

योगेश संतोष इंगळे (वय 19) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभम ईश्‍वर तायडे (वय 19), शुभम देवानंद प्रधान (वय 22), महेश बाळू लगाडे (वय 22, तिघेही रा. जाधववाडी, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची पिंपरीतील नव महाराष्ट्र महाविद्यालयात भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी इंगळे यांचे मित्र गौरव पंडितराव साळुंखे (वय 20), अमोल रतनराव साळुंखे (वय 21), ऋषिकेश बाळू मांडेरे (वय 20) आणि अमोल याची आई अंजू साळुंखे यांना लोखंडी रॉड व काठीने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.