Vadgaon Maval : पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती विवेक वळसे पाटील यांचा सत्कार

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ पंचायत समितीच्या हंगामी सभापतिपदी राष्ट्रवादीचे विवेक वळसे पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीबद्दल वळसे पाटील यांचा पुणे जिल्हा परिषद सभागृहात सत्कार करण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष मु-हे, राष्ट्रवादी काँग्रेस औद्योगिक विभाग मावळ तालुका अध्यक्ष सतीश सातकर, युवानेते संतोष सातकर, सोमनाथ सातकर, सावळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राजु क्षीरसागर आदी उपस्थित होते.

वडगाव मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाब म्हाळसकर व उपसभापती शांताराम कदम यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने रिक्त सभापतीपदाच्या जागेसाठी राष्ट्रवादीचे विवेक वळसे पाटील यांची पंचायत समितीच्या हंगामी सभापतीपदी निवड करण्यात आली.  बऱ्याच वर्षानंतर मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला महत्वाचे पद मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.