BNR-HDR-TOP-Mobile

Pune : विनायक शिरसाट खून प्रकरण: सुरवातीला ज्याला ताब्यात घेऊन सोडले त्याच्याच शोधात पोलीस

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- माहिती अधिकार कार्यकर्त्याचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने तेलंगणा राज्यातून दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय ज्या ओमप्रकाश वर्मा याच्यावर आहे तो मात्र फरार आहे. शिरसाट बेपत्ता झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी वर्मा याला चौकशीसाठी ताब्यातही घेतले होते. परंतु काहीच निष्पन्न न झाल्याने त्याला सोडून दिले होते. त्यानंतर तो बेपत्ता झाला. त्याच्या मागावर आता पोलीस पथके रवाना केली असून त्याला पकडल्यानंतर या खून प्रकरणाचा उलगडा होईल अशी माहिती परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिली.

विनायक सुधाकर शिरसाट (वय 30, रा. शिवणे) असे खून झालेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव आहे. मुळशीतील मुठा गावाजवळ असलेल्या दरीत त्याचा मृतदेह सापडला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी मुक्तार अली आणि फारूख खान या दोघांना तेलंगणा राज्यातून ताब्यात घेतले आहे. त्यातील एक जण ड्रायव्हर म्हणून काम करीत असल्याची माहिती समोर येत आहे. तर मुंबईतुन एका महिलेलाही ताब्यात घेतल्याची माहिती पुढे येत आहे. खुनाचा सूत्रधार ओमप्रकाश वर्मा असून तो फरार आहे. त्याच्या शोधात पुणे पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशात गेले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.