Bhosari : गाडीचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही मालकी हक्क न दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – एक चारचाकी गाडी देऊन दुसरी चारचाकी गाडी घेतली. त्यात ठरल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण केला. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर देखील गाडी खरेदीदाराच्या नावावर करून दिली नाही. याप्रकरणी गाडी विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कासारवाडी येथी ओम साई कार्स येथे घडली.

जसबीर कौर चावला (वय 54, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अस्लम तांबोळी (रा. पिंपळे गुरव रोड, कासारवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे क्रुझर कार (एम एच 12 / जी एफ 7059) होती. त्यांनी त्यांची क्रुझर गाडी देऊन पजेरो गाडी (एम एच 14 / सी झेड 0045) घेण्याचा व्यवहार केला. या व्यवहारात क्रुझर गाडीची किंमत चार लाख रुपये ठरविण्यात आली. त्यानंतर फिर्यादी यांनी एनईएफटी द्वारे आरोपीला 3 लाख 75 हजार रुपये दिले. त्यानंतर 4 लाख 75 हजार रुपये रोख दिले. यानंतर त्यांचा पैशांचा व्यवहार पूर्ण झाला. त्यानंतर आरोपीने पजेरो कार फिर्यादी यांच्या नावावर करून दिली नाही. फिर्यादी यांनी दिलेल्या पैशांचा अपहार केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.