Pune : ‘केपीआयटी ‘आणि ‘ज्ञान प्रबोधिनी’आयोजित ‘छोटे सायंटिस्टस्’ स्पर्धेचा समारोप

एमपीसी न्यूज- ‘केपीआयटी ‘ टेक्नॉलॉजीस लिमिटेड आणि ‘ज्ञान प्रबोधिनी’आयोजित ‘छोटे सायंटिस्टस्’ स्पर्धेचा समारोप नुकताच करण्यात आला. विजेत्या शाळांना पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष होते.

या उपक्रमात ‘वी -सॉल्व्ह ‘ ही समस्या परिहार स्पर्धा होती, त्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक परिसरातील समस्या देऊन त्यावर वैज्ञानिक उत्तर शोधण्याचा प्रकल्प करण्यास सांगण्यात आले होते. विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, स्कुलबॅग व विजयी शाळांना ट्राफी देण्यात आली .

पुणे मनपा क्षेत्रातील इयत्ता 8 वी गटात प्रथम क्रमांक संत नामदेव माध्यमिक विद्यालय ( महर्षीनगर पुणे ), दुसरा क्रमांक राजीव गांधी ई लर्निग स्कूल (सहकार नगर), तृतीय क्रमांक यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय( बिबवेवाडी) यांना मिळाला. पिंपरी -चिंचवड मनपा गटात प्रथम क्रमांक पिंपरी – चिंचवड मनपाचे थेरगाव स्कूल, द्वितीय क्रमांक पिंपरी -चिंचवड मनपाचे पिपळे गुरव स्कूल यांना मिळाला .

इयत्ता 8 वी गटात मावळ व मुळशी विभागातून प्रथम क्रमांक संत तुकाराम विद्यालय ( शिवणे) दुसरा क्रमांक श्रीराम विद्यालय (नवलाख उंबरे),तिसरा क्रमांक स्व बाबूराव रायरीकर माध्यमिक विद्यालय(उरवङे) यांना मिळाला .

इयत्ता 9 वी गटात प्रथम क्रमांक ग्राम प्रबोधिनी विद्यालय( साळुम्बरे ).दुसरा क्रमांक पंचक्रोशी विद्यालय (दारूब्रे) तृतीय क्रमांक व्हिजन इंग्लिश स्कूल (न-हे आंबेगाव ) यांना मिळाला .

_MPC_DIR_MPU_II

अटल टिंकरिंग लॅब ‘ असलेल्या शाळांच्या ‘छोटे सायंटिस्टस् ‘ स्पर्धेत एसपीएम स्कूलचा प्रथम क्रमांक आला. द्वितीय क्रमांक मिलेनियम नॅशनल स्कूल (पुणे ) तर तृतीय क्रमांक सुंदराबाई राठी स्कूल (पुणे) यांनी पटकावला .

किशोर पाटील (व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ,केपीआयटी उद्योग समूह ), पिंपरी -चिंचवड मनपा माध्यमिक शिक्षण अधिकारी पराग मुडे, डॉ. सारिका केळकर, राहूल उपलप, संत रंजन ( टीम लिङर ,केपीआयटी) प्रकाश रणनवरे (स्पर्धा समन्वयक ) यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

13 फेब्रुवारी रोजी पुण्यात झालेल्या या स्पर्धेत मावळ -मुळशी तालुक्यातील 20 शाळा, पुणे महानगर क्षेत्रातील 10 शाळा ,पिंपरी -चिंचवड क्षेत्रातील 8 शाळा अशा 38 शाळा आणि 200 विद्यार्थी सहभागी झाले. 14  फेब्रुवारी रोजी ‘अटल टिंकरिंग लॅब’च्या 16 शाळा आणि 100 विद्यार्थी सहभागी झाले .

किशोर फडतरे, तुषार जुवेकर (केपीआयटी ) यांनी स्पर्धा संयोजन केले. प्रणव पुजारी यांनी सूत्रसंचालन केले . केपीआयटीच्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख राजेश सिंग, परेश शिंदे, गणेश भताणे, विशाल गायकवाङ, अक्षय कुलथे, प्रशांत दिवेकर उपस्थित होते .

2012 मध्ये 20 शाळांमध्ये 800 विद्यार्थ्यांमध्ये सुरु झालेला हा उपक्रम 177 शाळा आणि 15 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. भारतातील 20 शहरांमध्ये हा उपक्रम पोहोचला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.