Pimpri : महापालिकेतर्फे परिवर्तन लोगो आणि टॅगलाइन स्पर्धा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची जीवनशैली उंचविण्यासाठी आणि वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी महापालिकेने शहर परिवर्तन प्रकल्प सुरू केला आहे. पहिल्यांदाच असा प्रकल्प हाती घेतला असून त्याअंतर्गत शहर परिवर्तनामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी लोगो आणि टॅगलाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

‘पिंपरी-चिंचवड शहर परिवर्तन’ यासाठी एक साजेल असा लोगो आणि टॅगलाइन देखील आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका नागरिक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यासाठी स्पर्धा घेत आहे. तीन लोगो आणि टॅगलाइनचे विजेत्यांना रोख रकमेच्या स्वरुपात पुरस्कार दिला जाणार आहे. लोगो स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 25 हजार रुपये, द्वितीय, तृतीय क्रमांकास अनुक्रमे 15 हजार, दहा हजार आणि सर्वोत्तम टॅगलाइनला दहा हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

विजेत्या लोगोचा वापर ‘पिंपरी-चिंचवड शहर परिवर्तन’ यासाठी अधिकृत लोगो म्हणून प्रस्तावित केला जाईल. लोगो डिझाइनची अवलंबना आणि नाविन्यपूर्ण कल्पनांच्या आधारावर लोगोचे मूल्यांकन केले जाईल.

स्पर्धेच्या नियम व अटी
सर्व नोंदी [email protected] या ई-मेलवर सादर करणे आवश्यक राहील.
प्रत्येक नोंदी बरोबर लोगोचे वर्णन (जास्तीत जास्त 100 शब्द) जोडलेले पाहिजे.
लोगोचा किमान आकार "x ४" (4 इंच x 4 इंच) असेल.
लोगोसह एक टॅगलाइन देखील आवश्यक आहे. (इंग्रजी / मराठी / संस्कृत)
नोंदी सादर करण्याची अंतिम तारीख – 20 फेब्रुवारी 2019 राहील.
लोगोमध्ये कोणतेही कॉपीराइट संरक्षित असलेली सामग्री (छायाचित्र, चिन्ह, प्रतीक, प्रतिमा इ.)
वापरण्यास मनाई आहे.
लोगोची प्रतिमा किमान 600 डीपीआय असावी.
लोगो डिझाइन केवळ .jpg किंवा .pdf स्वरूपामध्ये सादर करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.