Pune : पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर फ्री, निषेध करण्यासाठी मुरुडकर झेंडेवाल्यांची वेगळी पद्धत

एमपीसी न्यूज- जम्मुतील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी पुण्यातील मुरुडकर झेंडेवाल्यांनी वेगळी पद्धत वापरली आहे. पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर फ्री अशाप्रकारच्या पाट्या त्यांनी दुकानात लावल्या आहेत.

पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 हुन अधिक सीआरपीएफचे जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याविरोधात देशभरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. देशात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. मुरुडकर झेंडेवाल्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. त्यासाठी हे पाकचे झेंडे घ्या आणि जाळा म्हणत त्यावर लायटर फ्री देण्यात येणार आहे.

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यानंतर पुण्यातही ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले. पुण्यातील काँग्रेसच्या 50 कार्यकर्त्यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहून राजीनामा देण्याची मागणी केली. मुस्लिम समाजाने पाकविरोधात घोषणा करत हल्ल्याचा निषेध केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.