Moshi : साठ वर्षीय वृद्धाकडून तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – “मला तुमच्याबद्दल प्रेमभाव आहे”, असे म्हणत अश्लील चाळे करत एका 60 वर्षीय वृद्धाने तरुणीचा विनयभंग केला. हा प्रकार शुक्रवारी (दि.15) दुपारी साडेबारा वाजता मोशी येथे घडला.

नारायण पोखरकर (वय 60, रा. साने चौक, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी वृद्धाचे नाव आहे. याबाबत 22 वर्षीय तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास फिर्यादी तरुणी बनकर वस्ती, मोशी येथे आपल्या घरात होती. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी पोखरकर याने “मला तुमच्याबद्दल प्रेमभाव आहे”, असे म्हणत अश्लील चाळे करत तरुणीचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी, एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.