Pimpri : आरपीआयकडून पुलवामा दहशतवादी भ्याड हल्ल्याचा निषेध

एमपीसी न्यूज – पुलवामा येथे जवानांच्या वाहनावर झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने आज (शनिवारी) निषेध करण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. तसेच शहीद जवांनाना श्रध्दांजली वाहण्यात आली.

रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्यावतीने काश्मीर हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष सुधाकर वारभवन, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम, सम्राट जकाते, अजिज शेख, विनोद चांदमारे, लक्ष्मण गायकवाड, ख्वाजाभाई शेख, बाबा सरवदे, भारत उंडे, शेख लाल लदाफ, दत्ताशेठ बनसोडे, कुणाल वाव्हळकर, सुजीत कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी मोदी सरकारकडे शहीद झालेल्या जवानांना 2 कोटी रुपये, एमआयडीसीमध्ये दोन एकर जमीन, सरकारी नोकरी द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. निषेधाच्यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, जवान झिंदाबाद अशा घोषणा यावेळी दिल्या. मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आरपीआयच्यावतीने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.