Somatane : विद्यार्थी जीवनातील यश भावी जीवनाच्या यशोमंदिराचा पाया- अनिल कातळे

देवळे विद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

एमपीसी न्यूज- विद्यार्थी जीवनात मिळणारे यश हे भावी जीवनाच्या यशोमंदिराचा पाया असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांचे शाळा कॉलेजातील जीवन यशस्वी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन एमपीसी न्यूजचे संचालक अनिल कातळे यांनी केले. सोमाटणे येथील आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे, सचिव सपना लालचंदानी, पिंपरी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या पोलीस उपनिरीक्षक सायली चव्हाण, व्यवस्थापक जयेश मुळे, उद्योजक नंदकुमार निंबाळकर, अँड प्रवीण तांबवेकर, प्राचार्य रमेश फरताडे आदी उपस्थित होते.

अनिल कातळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी लेखू नये. आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेलात तर यश तुमचेच आहे असा विश्वास कातळे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

देवळे म्हणाले की, परीक्षेला आनंदाने सामोरे जा म्हणजे परीक्षेची भीती वाटणार नाही. तसेच उच्च ध्येय ठेवून ते गाठण्यासाठी संकटावर मात करायला शिका असा संदेश देऊन त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षण दर्जेदार व समाजोपयोगी घेऊन सामाजिक सलोखा देखील जपला पाहिजे असे मत सायली चव्हाण यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कंपास, पँड, पेन, व हॉल तिकीट देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजन देण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक मच्छिंद्र कापरे, रामभाऊ घुगे, बद्रीनारायण पाटील, अमित वावरे, लक्ष्मीकांत ठाकूरद्वारे, सुजाता गोपाळे, अनिता गावडे, दीपश्री पानसरे, अर्चना पवार, राधेशाम वारे, विनायक गायकवाड, किरण धादवड, लालासाहेब डोले, विष्णू सानप, बिरू खरात, राहुल होवाळ आदीचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्राजक्ता खैरे हिने केले. आभार संतोष चव्हाण यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.