India Corona Update : गेल्या 24 तासांत 8,774 नवे कोरोना रुग्ण, 9,905 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत 8 हजार 774 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 9 हजार 905 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या निरंतर कमी होत आहे. सध्याच्या घडीला देशात 1 लाख 03 हजार 859 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 45 लाख 80 हजार 832 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 40 लाख 08 हजार 183 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.34 टक्के एवढा झाला आहे.

देशात गेल्या 24 तासांत 236 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 68 हजार 790 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.36 टक्के एवढा झाला आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 122 कोटी 41 लाख 68 हजार 929 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 42 लाख 04 हजार 171 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.