Bhosari : माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली शहीद जवानांसाठी निघाला कँडल मार्च

एमपीसी न्यूज- जम्मू-काश्मीर पुलवामात झालेला दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भोसरीच्या संतनगरमध्ये माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली कॅंडल मार्च काढण्यात आला. या मोर्चामध्ये संतनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दसरा चौकातून सेक्टर 4, 6 व 9 या भागातून ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय जवान जय किसान’ अशा घोषणा देत एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये हा मोर्चा दाखल झाला. या ठिकाणी शहीद जवानांच्या स्मरणार्थ वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंटे, नगरसेवक विक्रांत लांडे, कर्नल तानाजी अरबुज, कॅप्टन चव्हाण, सुबेदार धनवे, अंकुश जाधव, लहु आवटी या सैनिकांच्या हस्ते अर्जुन वृक्षाचे रोपण करण्यात आले. त्यानंतर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी संतनगर मित्र मंडळ अध्यक्ष विठ्ठल नाना वाळुंज, नगरसेवक विलास मडिगेरी, माजी नगरसेवक संजय आहेर, साहेबराव गावडे, कामगार नेते हनुमंत लांडगे, अनिल घाडगे, जगन्नाथ माने, मसाप भोसरीचे अरुण इंगळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, निकुंज रेंगे, शरद दळवी, बाळासाहेब गायकवाड, शेवकरी काका, कावडे ताई, नेताजी पाटील, सुशील अहिरे, राजेश किबिले, अॅड.सुजाताताई बिडकर, नंदकुमार ताकवले, अशोक यादव, राजेंद्र ठाकूर, कैलासराव आवटी, विश्वनाथ टेमगिरे, संजय पाटील, सुहास पाटील, सिनेट सदस्य पांडुरंग वाळुंज, रामदास चपटे, बाबा खंडायत, निलेश काळकुटे, किशोर गुंजाळ, भरत भोसले, रवी पाटील, विजय लोखंडे, निवृत्ती शिंदे, विकास सावंत, विमल शेळके, युवराज खोत, विजय खुर्द तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.