Chinchwad : छत्रपती संभाजी महाराज साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांची हॉटेल रागाला सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज या दोन उत्तुंग व्यक्तिरेखा छोट्या पडद्यावर साकारण्याचा बहुमान मिळालेली एकमेव व्यक्ती म्हणजे डॉ. अमोल कोल्हे. त्यांनी आधी एका मालिकेत हिंदुहृदयसम्राट, धुरंधर, संयत, क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज हुबेहूब साकारले. त्यानंतर सध्या त्यांचीच निर्मिती असलेल्या स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत ते तेजतर्रार, तडफदार, स्वाभिमानी छत्रपती संभाजीमहाराज तितक्याच ताकदीने आणि विविध बारकाव्यांसह साकारत आहेत. नुकतेच आपण सिंहासनारुढ संभाजीमहाराजांना आपल्या हृदयात आणि डोळ्यात साठवून ठेवले. वैयक्तिक जीवनात खवय्ये असणारे डॉ. अमोल कोल्हे वेळ मिळाला की कधीतरी डायट वगैरे विसरुन महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतात.

आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थो़डासा वेळ काढून पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित एका व्याख्यानमालेच्या निमित्ताने ते नुकतेच शहरात आले होते. यावेळी त्यांनी आवर्जून चिंचवडस्टेशन येथील हॉटेल रागा(व्हेज) येथे सदिच्छा भेट दिली. तेथील महाराष्ट्रीयन थाळीची त्यांनी खास माहिती घेतली आणि त्याचा आस्वाद घेतला. यावेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, स्थायी समिती सदस्य नगरसेवक अमित गावडे, हॉटेल रागाचे मालक राहुल गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

चिंचवडस्टेशन येथील हॉटेल रागामध्ये महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीची मोहोर मानली जाणारी परिपूर्ण अशी थाळी खवय्यांना तृप्त करीत असते. भरली भेंडी, बटाटा रस्सा, भरली वांगी, अळू भाजी, मटकी उसळ, पिठलं, ज्वारी, बाजरीची भाकरी, पोळी, सुरळी वडी, कोथिंबिर वडी, खमंग काकडी, भजी, मसाला भात, थालिपीठ, ठेचा, तूप घातलेले गोडे वरण यासारख्या खास महाराष्ट्रीय पदार्थांची येथे रेलचेल आहे. स्पेशल मराठी पदार्थ तेसुद्धा पूर्णपणे शाकाहारी आणि महाराष्ट्रातील विशिष्ट चवीचे मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे येथे तुम्हाला खास मराठी चवीची ओळख करुन देणारे विविध पदार्थ उपलब्ध आहेत. मुख्य जेवणानंतर स्वीट डिश म्हणून मोदक, ओल्या नारळाच्या करंज्या, बासुंदी, जिलेबी, श्रीखंड, आम्रखंडदेखील येथे मिळू शकते. थाळीत एका वेळी दोन गोडाचे पदार्थ उपलब्ध असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.