Pune : बारावीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून परीक्षा केंद्रावर स्वागत

एमपीसी न्यूज- शालेय जीवनातील शेवटची आणि करीअरच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा आज पहिला दिवस. ही परीक्षा देण्यासाठी आलेल्या पुण्यातील भावे हायस्कुल येथे विद्यार्थ्यांचे औक्षण करून आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

परीक्षा केंद्रावरील अधिकारी आणि शिक्षकांनी परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. तसेच या विद्यार्थ्यांना ‘टेंशन घेऊ नका, पेपर चांगला लिहा’ असा आधार वजा सल्लाही दिला.

या परीक्षेसाठी राज्यभरातुन तब्बल 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थी बसले आहेत. आज परीक्षेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांना कठीण वाटणाऱ्या इंग्रजीचा पेपर. त्यामुळे उत्साह, हुरहुर, परीक्षेचा ताण अशा संमिश्र वातावरणामध्ये विद्यार्थी असतात. त्यांचा ताण हलका व्हावा यासाठी भावे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करून, फुले देऊन स्वागत करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.