BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi: महिलेला इन्स्ट्राग्रामवरून अपहरणाची धमकी

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – ‘तू माझ्याशी मैत्री करशील का?’ मी तुला भेटायला आलोय, तुझा नंबर देशील का ?’ असे म्हणून माझे मॅसेज बघितले नाहीस तर किडनॅप करेन अशी धमकी एकाने इन्ट्राग्रामवरून तरुणीला दिली. हा प्रकार निगडी येथे नुकताच घडला.

या प्रकरणी 22 वर्षीय तरुणीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9028877270 व 8494053720 या क्रमाकाच्या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तू माझ्याशी मैत्री करशील का?’ मी तुला भेटायला आलोय, तुझा नंबर देशील का ?’ असे म्हणून माझे मॅसेज बघितले नाहीस तर किडनॅप करेन अशी धमकी दोन अज्ञात मोबाईल धारकांनी महिलेला दिली. यावरून घारबलेल्या तरुणीने 9028877270 व 8494053720 या क्रमाकांच्या मोबाईल धारकांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. निगडी पोलिस तपास करत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
.