हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि आपले चित्रपट (लेखांक तिसरा)

(सतीश वसंत वैद्य)

एमपीसी न्यूज- मागच्या लेखाचा शेवट मालकंस रागातील त्या लोकप्रिय धूनने केला होता…टॅटटॅटा,…वगैरे..त्याची सरगम सांगतो म्हणजे लगेच आठवेल..ती अशी…“सामगम,सानिसाध,नि धमगसा..मालकंस अर्थात ‘ध’ नि’ कोमल. गुंज ऊठी शहनाई नंतर तशी एखाद कथानक घेऊन संपूर्ण शास्त्रीय संगीतावर केलेली कलाकृती काही अपवाद..चित्रलेखा आम्रपाली नंतर 1977-78 मधील “किनारा” अशा सोडल्या तर विशेष काही आल्या नाहीत. तरीपण सिनेमात एक दोन गाणी शास्त्रीय संगीतावर आधारीत असायची. शंकर जयकिशन, एस.डी.बर्मन, रवी, ओ.पी.नय्यर, नौशाद, रोशन, चित्रगुप्त सारखी मंडळी तसेच किशोर, आशा भोंसले, मुकेश, यांची हलकी फूलकी उडत्या चालीवरील गाणी लोकांना सिनेमातून ऐकायला आवडायची. करमणूक म्हणजे निखळ सोप अस काहीतरी असाव अस वाटणारा वर्ग निर्माण होत होता.

त्या काळी बीग थ्री” दिलीप देव राज” यांनी ठरवूनच टाकल होत जणू की दिलीपकुमार असेल तर नौशाद व आवाज मो.रफी, देव आनंदसाठी एस.डी.व आवाज किशोर कुमार, राज कपूर साठी शंकर जयकिशन व आवाज मुकेश…यात सहसा बदल होत नसे. लोकांनी पण तसंच पसंत केल होत.मुकेशने अजिबात शास्त्रिय गाण गायल नाही अस नाही. पण 1968-69 साली राजेश खन्नाचा.आराधना” आला. त्या नंतर जवळ जवळ सर्वच सिनेमातून कोणताही हिरो असो प्ले बॅक फक्त किशोर!! हे एक हूकमी चलतीच नाणंच जणू वर आलं आणि नंतर तर शास्त्रीय संगीत जवळ जवळ अंतर्धान पावलं गेलं. अगदी दिलीप साहब देखील “सगीना” या चित्रपटात किशोरच्या प्ले बॅकसाठी आग्रही होते म्हणे…

तर…1958-59 चे दरम्यान नवरंग, कोहिनुर,मुगले आज़म, बरसात की रात, अनुराधा सारखे अनेक चित्रपट आले. त्यात बऱ्यापैकी शास्त्रीय संगीताचा वापर केला होता. साठ साली एस.एन.त्रिपाठी या गुणी दिग्दर्शक तथा संगीतकार यांनी “संगीत सम्राट तानसेन” या नावानं पुन्हा पूर्ण शास्त्रीय संगीतावर एक सिनेमा आणला. सहगल यांच्या सिनेमापेक्षा प्रगत रचना, वाद्यमेळ, रेकाॅर्डिंग, चित्रीकरण वगैरे घेऊन ! त्यातील “सप्तसूर तीन ग्राम”ही रचना संत व गुरू हरिदास यांची तशीच आडा चौताल मधील मन्ना डे यांच्या आवाजात ठेवली. पण मन्ना डे नी व रफी यांनी गायलेल “सूध बिसर गयी आज” हे गीत अजून ही रोमांच उभे करतात. मन हेलावून टाकतात ते सूर! तसच “गूंजती चली हवा” मूकेश ,राग शीवरंजनी !!रोज ही गाणी एकदातरी कोणत्या ना कोणत्या रेडिओ स्टेशनवर लागायची. पण बिनाका गीतमाला मधे “चोटीकी तीन पायदान”पर यातल एक हीआलं नाही.लोकांची रूची बदलते आहे हे तेव्हांपासूनच जाणवू लागलं होतं.

सर्वसाधारण श्रोत्यास अभिजात स्वरसंगीत (classical music) तितकसं समजत नाही म्हणा किंवा क्लिष्ट वाटतं.त्यांचा ओढा हलके फूलके अर्थात लाईट म्यूझीककडे असतो. त्या ललीत संगीतात भावगीते, गौळणी, भजने, अभंग व इतर लोकसंगीत तथा सिनेसंगीत असते. त्यातील अर्थप्रधान शब्दसूरांच मिश्रण तथा सहयोग असल्यामूळे काव्यार्थाच्या आनंदात ते असतात. समजायला सोपे काव्य तशीच गायला सोपी चाल असली की ते गीत लोकप्रिय होते. सिनेसंगीत तस होण अपरिहार्य झालं. फिल्म मेकिंग, चित्रपट हा व्यवसाय असल्यामुळे हे साहजिक आहे. आपण अगदी 1952 मधील “फूटपाथ”या सिनेमात दिलीपकुमारवर चित्रीत तलत मेहमूदच गाणं” शामे गमकी कसम”संगीत खैयाम हे पहा.त्यात फक्त स्पॅनिश गीटार आणि डबल बेस ढोलक–तबला नाही.स्वतः खैयाम साहेबांनी सांगितलंय की ही तर्ज पाश्चात्य अभिजात सिंफनीच्या धर्तीची व आवाज मुद्दामच मूलायम असा तलत चा घेतला होता.हे गीत रात्री 10.30–11च्या विविधभारतीच्या कार्यक्रमात ऐकायला अजूनही खूप आवडतं.आपण रिलॅक्स होतो.

बरसातकी रात आणि रोशन..”रोशन नागरथ” यांच्या अनेक कथा आहेत.आपले वासुदेव भाटकर अर्थात स्नेहल भाटकर यांना केदार शर्मांनी 1947मधे “नीलकमल”या राज कपूर हिरो असलेली राजची पहिली फिल्म मधे ब्रेक दिला होता.त्यात राज कपूरला पहिला प्ले बॅक स्नेहल भाटकरांचा आहे बरं का.मधेच हे सांगण्याच कारण रोशन! “नील कमल” नंतर भाटकरांनी शर्मांबरोबर काही सिनेमे केले.पण एकदा केदार शर्मा भाटकरांना म्हणाले”भाटकर साब,इसबार मै पिक्चर किसी औरको देना चाहता हूं।रेफ्यूजी है…पंजाबसे आया है,रोशन नागरथ !” भाटकर म्हणाले”कोई बात नही।करने दो उनको” अशी आपली मराठी वृत्ती..पुढं पुढं करणं नाही.कुणावर कूरघोडी नाही.भांडण तंटा नाही.देण्याची प्रवृत्ती…तर अशा रीतीने रोशनकडे “बावरे नयन” आला व त्यानी तो तेव्हां हिट करून दाखवला. रोशन हे नांव पहिल्या पिक्चरपासूनच हिट ठरलं.रूहानी संगीत याने रोशन..!ते संगीत आत्म्याला भिडणारं संगीत !बरसातकी रात नंतर रोशनचे सम्राट चंद्रगुप्त,आरती ताजमहल,दिलही तो है,चित्रलेखा,देवर,ममता,भीगीरात,बहूबेगम असे अनेक आले.शेवटी अनोखी रात हा1969 मधे आला पण त्याची गाणी खूप आधीच केली होती.रोशन फक्त पन्नास वर्षांच आयुष्यच जगला.1917 ते 1967. 16 नोव्हें.67 रोजी स्वर्गवासी झाले.

बरसातकी रात मधील सर्व गाणी हिट झाली.”ना तो काँरवाकी तलाश है” ही कव्वाली तर अजरामर! बाकी गाणी पण अगदि रागदारी नसतील पण शास्त्रियच्या जवळची होती.मल्हार रागावर आधारीत”गरजत बरसत सावन आयो रे”गाण 1951साली रोशनने “मल्हार”नांवाने आलेल्या चित्रपटासाठी लताकडून गाऊन घेतल होत.पण तेव्हा लोकाना काही आवडल नाही. मल्हारमधील इतर गाणी आवडली होती.रोशनला मात्र हेच गरजत बरसत फारच आवडायचं.आणि तेव्हां ते लोकप्रियता मिळवू शकल नाही याचं शल्य त्याच्या मनांत होतं.म्हणूनच तब्बल दहा वर्षांनी तेच गाणं बरसातकी रात मधे …लता ऐवजी सुमन कल्याणपूर व कमल बारोट असं ड्यूएट केल.लताबाईंच्या आवाजाची सर या दोघींच्या आवाजाला कितपत आली हे नाही सांगता यायचं पण रोशनने बांधलेली चालच इतकी अप्रतिम आणि गोड आहे की” बरसातकी रात”च्या टायटल साँग म्हणून हे गाणं एकदम चपखलपणे बसलं.

चित्रलेखा”हा सिनेमा 1963-64 मधे आला.केदार शर्मा दिग्द.संगीत रोशन.हा एक राजनर्तकी आणि राजपूत्र(पुन्हा तेच ते)..बिजगूप्त..सम्राट चंद्रगुप्तच्या घराण्याचा वारस व चित्रलेखा नर्तकी यांची असफल प्रेमकहाणी असा चित्रपट.फक्त रोशनच शास्त्रिय संगीतावरील गाणी सोडलं तर सिनेमा एकदम भंपक.!!राग कलावती,यमन,कामोद वर आधारीत गाणी आणि त्यावर नृत्ये एवढच काय ते बाकी काहीच परत परत पाहण्यासारखं नव्हतं.मीनाकुमारी पण काही खास नाही.मला वाटतं तेव्हांपासूनच तिची प्रकृति ढासळत चालली होती. खूपच अल्पायूषी…अवघं चाळीस वर्षांच आयुष्य लाभलेली कसलेली अभिनेत्री,ट्रॅजेडी क्वीन…इतक्या कमी आयुष्यांत 95-96सिनेमे केले. असो.रोशनने यमन रागावर बरीच गाणी रचली.जिया ले गयो जी मोरा सावरिया”आरती,”छूपा लो यूं दिलमें प्यार मेरा..ममता,”मन रे तू काहे न धीर धरे..चित्रलेखा,आणि पुन्हा अप्रतिम कव्वाली”निगाहें मिलानेको..दिल ही तो है..नूतनचा अभिनय बेस्ट…मला यमनची एवढीच रोशनन केलेली गाणी आठवली..तुम्हाला पहा आठवतात का…!

मदन मोहन,नौशाद इ.संगीतकारांनी खूप चांगल्या ग़जल दिल्या. लोरी,अंगाई गीतं पण शास्त्रिय संगीतावर अनेकानेक सापडतील.विस्तारभयास्तव इथे नमूद करू शकत नाही. “आम्रपाली”ही संपूर्ण कलाकृती वैजयंतीमालाचं शास्त्रीय संगीतावरील नृत्य पाहण्यासाठीच तयार केली होती. सूनील दत्तला विशेष काही अभिनय दाखवायला वावच नव्हता.कथा परत तशीच पण प्रेम सफल !सर्व लढाया मगधचा सम्राट अजातशत्रू जिंकतो.शंकर जयकिशन यांनी “कठपुतली आणि “आम्रपाली”ह्या दोन्ही नृत्यप्रधान सिनेमात नृत्यांगना वैजयंतीमालासाठी तसच अप्रतिम वाद्यमेळाच अप्रतिम संगीत दिल होतं.

नंतरच्या काळात गाणी ऐकण्यापेक्षा ती पाहण्यात लोकांना रस वाटू लागला होता.शास्त्रिय चालीतील गाण्यांवर नृत्य पाहण्यात! वैजयंतीमाला,पद्मीनी,रागीणी सारख्या दक्षिणी नर्तिकांचे क्लासीकल डान्स लोकांना आवडू लागले.तस नृत्य काही नवीन नव्हतं.गोपीकृष्णने बर्याच सिनेमांमधनं तस नृत्य केल होतं.झनक झनक,नवरंग,मधली संध्याच्या नृत्याची तुलना त्या दक्षिणी तारकांच्या नृत्यांशी होऊच शकत नाही.चित्रपट कल्पना, रागीणी, राजतिलक (1958..सी.रामचंद्र..पद्मिनी आणि वैजयंतीमाला ), कठपुतली, आम्रपाली,डाॅ.विद्या,ज्यूवेल थीप.वैजयंतीमाला ही बेसिकली नृत्यांगना असल्यामूळे तिला एक तरी नृत्य असायचं. वहीदा रेहमान ही पण शास्त्रीय नृत्यांगना “नीलकमल, गाईड, तिसरी कसम” सूपरहिट नृत्ये. तसच राजश्री (शांताराम कन्या)हिने “गीत गाया पत्थरोंने,सगाई” सारख्या सानेमात चांगली शास्त्रीय नृत्ये सादर केली. अगदि दिलीपकुमारच्या “आजाद”मधील “अपलम चपलम” मधूबालाच “प्यार किया तो डरना क्या” आणि वर उल्लेखलेली इतर शास्त्रिय नृत्यांबरोबरच रंभासंभा,राॅक अॅन रोल,ट्विस्ट,किशोरकुमारच नाचणं,मेहमूद,शम्मीकपूरचा धांगडधिंगा,इतकच काय “आरपार”मधील क्लब हाॅटेल्स मधले डान्स पाहून पाहून चाळीत,वाड्यातन तरूण मंडळी “रेकाॅर्ड डान्स”हा प्रकार गणेश उत्सवातून करायला लागली आणि शास्त्रिय संगीत इनक्लूडींग शास्त्रिय नृत्ये हळूहळू लोप पावत चाललं. नाही म्हणायला श्रीदेवी,रेखा,माधुरी दिक्षित वगैरे तारकांनी ते जीवंत ठेवायचा प्रयत्न केला…..पण त्याच्या बरच आधी राज कपूरनं वैजयंतीमालाला“संगम”मधे एक्सपोज केलं.सेन्साॅरन कसबस बर्याच चर्चेनंतर ते सीन्स पास केले.

आमच्या घरच्या सेन्साॅरने आम्ही वाड्यातली मुलं नुकतीच वयात येत होतो म्हणून आम्हाला “संगम” बघायला पैसे दिले नाहीत.तसं त्याकाळी आम्हाला पाॅकेट मनी वगैरे काही माहीतच नव्हतं.नंतर तसाच काहीसा ट्रेंड हिदी सानेमांमधे आला.बाकी आशा पारेख,साधना,माला सिन्हा,सायरा बानू वगैरेंनी आपापल्या परिनं नृत्य केली.वहीदा रेहमानचं नृत्य कधी भडक वाटल नाही अगदि “पान खाये संय्या हमारो”सुद्धा..! तर सायरा बानूला बर्याच वेळा बर्यापैकी भडक दाखवलं गेलं आणि तिनं ते केलं.मग हेलन मॅडमन कॅब्रे नांवाचा प्रकार आणला.जयश्री तळपदे,अरूणा ईराणी,लक्ष्मीछाया सारख्यांनी बरेच कॅब्रे सादर केले.राज कपूरनं हिरोईनला”डिंपल”ला तर अगदि कमीत कमी कपड्यांत “बाॅबी”मधे आणलं मग ज्यूली”सारखे तसे चित्रपट आले.शास्त्रिय संगीताची आणि नृत्याची हळूहळू घसरगूंडी व्हायला लागली.ह्या सगळ्यात हेमा मालीनी या गुणी नृत्यांगनेचा उल्लेख करायच राहीलं.

सपनोंका सौदागर”हिरो राज कपूर हा पहिला सिनेमा.खर्या अर्थान नृत्यांगना म्हणून”अभिनेत्री””मृगतृष्णा”मधून दिसली.शास्त्रिय संगीताचा फार कमी वापर करणारे संगीतकार लम्क्षी प्यारे नी अभिनेत्री साठी बरं शास्त्रिय दिलं होतं.”लेकिन”संगीत हृदयनाथ मंगेशकर,नृत्य अफलातून!!तसच सूपरहिट “किनारा” संगीत राहूल देव बर्मन…शास्त्रिय संगीत व नृत्यांची रेलचेल..!जूगनू,नया जमाना,सीता और गीता प्रसंगानूरूप नृत्ये..ह्या सर्व सिनेमांपैकी “किनारा” अविस्मरणीय….असो. नंतर नंतर 1993 साली “दामिनी” संगीत नदीम श्रवण मधील मीनाक्षी शेषाद्रीचं तांडवनृत्य मात्र खरोखर अप्रतिम…आपण 1990 पर्यंतचा काळच बघणार आहोत पण हा अपवाद फक्त एकच.

पुढील भागात आणखी काही महत्वाची कारणं ज्यामूळे संगीत कसंकसं बदलत गेलं ते बघू या..
(क्रमशः)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.