Pune : नृत्य आणि गायनातून ‘बसंत उत्सव’ साजरा

नृत्याद्वारे उलगडल्या वसंत ऋतूच्या विविध छटा

एमपीसी न्यूज- ‘बांगीया संस्कृती संसद’ च्या वतीने ‘बसंत उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम 2019’ साजरा झाला. नृत्य आणि गायनाद्वारे एम्प्रेस गार्डन च्या निसर्गरम्य आणि खुल्या आकाशात सादर झालेल्या कार्यक्रमात वातावरण वसंत ऋतूमय झाले होते. बसंत उत्सवाचे 14 वे वर्ष होते.

कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणे सुरेश पिंगळे (विश्वस्त मंडळ प्रमुख ,एम्प्रेस गार्डन) ,श्रीमती पिंगळे, सास्वती गुहा ठाकुर (दूरदर्शन बंगालीच्या पहिल्या निवेदक व अभिनेत्री) आणि त्यांची कन्या श्रेया गुहा ठाकूर यांच्या हस्ते झाले. उदघाटन प्रसंगी पुलवामामधील शहीद अमर जवानांना १ मिनिट स्तब्धता राखून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या प्रसंगी आयोजन समितीचे सुजाता पॉल, मधुमिता घोष, अरुण चट्टोपाध्याय, सुबसीस बगल, राखी चटर्जी, बिरेस्वर मित्रा, शिवाजी मुखर्जी, स्वप्नकुमार लाहिरी उपस्थित होते.

हिवाळ्याचे दिवस संपून हवेत नावीन्य आल्याची चाहूल देणारा हा बसंतोत्सव असतो. ‘बांगिया संस्कृती संसद’ ही पुण्यातील ५३ वर्षांची सामाजिक-सांस्कृतिक संस्था आहे. या संस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून बंगाली संस्कृती आणि साहित्याचा प्रसार केला जातो.

रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक गाण्यावर आधारित ‘बसंत गीती’ या समर्पित कार्यक्रमात वसंत ऋतूतील रम्य सकाळच्या छटांचे विविध पैलू नृत्याद्वारे उलगडण्यात आले. नबीन -गीतनाटिकेतील रवींद्र संगीतातून सुंदर संगीत नृत्याची सांगड घालून वसंत ऋतूचे दर्शन या सांस्कृतिक कार्यक्रमातून घडविण्यात आले, अशी माहिती बांगीया संस्कृती संसदच्या उपाध्यक्ष मधुमिता घोष यांनी दिली.

सास्वती गुहा ठाकुर आणि श्रेया गुहा ठाकूर यांनी एकत्रित ‘तुमी माता तुमी कन्या’ कार्यक्रमातून ‘रबिन्द्र संगीत’ सादर करून वातावरण संगीतमय केले. त्यांना तबल्यावर श्रेष्ठ कलाकार बिप्लाब मोंडल आणि सिन्थेसायझरवर सुब्रता मुखर्जी यांनी साथ सांगत केली. रवींद्रनाथ टागोरांच्या निवडलेल्या गाण्यांवर आधारित हा कार्यक्रम होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपंकर मुझुमदार यांनी केले. आभार सुबसिस बागल यांनी मानले. “बसंतोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम ज्यांचे मूळ गुरुदेव रवींद्रनाथ टागोरच्या जन्मस्थानी शांतीनिकेत आहे. ज्यामध्ये लोकांना एकत्र आणून विविध रंग रुपी आनंद आणि प्रेम देते” असे या कार्यक्रमाबद्दल बोलताना सुजाता पॉल म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.