-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune : ताम्हिणी घाटात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – मृतदेह ताम्हिणी गाव ते मुगाव या जंगलातून जाणा-या कच्च्या घाट रस्त्यात निर्जन खिंडीजवळ सुमारे 24 वर्ष वयाच्या तरुणाचा मृतदेह मंगळवारी (दि. 26) आढळला. तरुणाच्या डोक्यात दगडाने मारल्याच्या खुणा असल्याने तरुणाचा खून केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

मृतदेह आढळलेल्या तरुणाचा बांधा सडपातळ आहे. उंची 5 फूट 11 इंच, रंग सावळा, चेहरा उभट असून निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आणि मल्टिकलर लायनिंग शर्ट घातलेला आहे. तरुणाच्या डोक्यात, डाव्या कानाच्या मागे, चेह-यावर मारून खून केला आहे. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पौड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पौड ग्रामीण रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आला आहे. तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

याबाबत पौड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील वर्णनाच्या तरुणाबाबत काही माहिती असल्यास पौड पोलीस आणि पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.