BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : शहरातील अवैध धंद्यांकडे पोलिसांचा जाणीवपूर्वक कानाडोळा

पोलीस आयुक्तांना रमेश वाघेरे यांचे मटका अड्ड्यांवर कारवाई करण्याचे निवेदन

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी, चिखली, भोसरी, निगडी परिसरात मटका अड्डे राजरोसपणे सुरु आहेत. याकडे पोलीस जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहेत. यामुळे शहरात सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

रमेश वाघेरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ‘सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत पिंपळे सौदागर येथे नदीपात्रात आसवानी गोपालन केंद्राशेजारी मटका अड्डा सुरु आहे. चिखली पोलीस स्टेशन हद्दीत साने पोलीस चौकीजवळ कृष्णानगर स्पाईन रोड येथे भीमशक्ती नगर झोपडपट्टी येथे मटका अड्डा सुरु आहे. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत निगडी जकात नाका येथे मटका अड्डा सुरु आहे. भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक रोडलगत मटका अड्डा सुरु आहे. याचबरोबर अन्य काही ठिकाणी देखील मटक्याचे अड्डे सुरु आहेत. मटका अड्ड्यांवर पोलीस जातात. मात्र त्यावर कारवाई काहीच होत नसल्याचे चित्र आहे. अति वरिष्ठ अधिका-यांना अंधारात ठेवून हा प्रकार होत आहे. त्यामुळे यावर योग्य ती कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

HB_POST_END_FTR-A4

.