Moshi : जुन्या भांडणाच्या रागातून दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून एकाला दगडाने मारहाण केली. ही घटना मोशी येथे सोमवारी (दि. 25) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

कुमार पद्माकर रसाळ (वय 35, रा. मोशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार नान्या मासाळकर व त्याचे चार साथीदार यांच्या विरोधीत एमआयीडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा साडू गणेश यांच्यासोबत सोमवारी संध्याकाळी दारु पित बसले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी ‘भिमा रसाळ याला ओळखतोस का’ असे विचारले व जुन्या भांडणाच्या रागातून फिर्यादी व त्यांच्या साडूला दगडाने मारहाण केली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.