Dighi : दुस-या मजल्यावर चढून एक लाखाची वायर चोरीला

एमपीसी न्यूज – दुस-या मजल्यावरील घरात ठेवलेले एक लाख रुपयांचे वायरचे बंडल अज्ञात चोरट्यांनी भिंतीवर चढून चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 27) सकाळी उघडकीस आली असून गुरुवारी (दि. 28) दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन साहेबराव गावडे (वय 31, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी त्यांच्या दुस-या मजल्यावरील घरात वायरचे बंडल ठेवले होते. बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटच्या मागील बाजूला असलेल्या भिंतीचा व खिडकीचा आधार घेत गॅलरीद्वारे फ्लॅटमध्ये प्रवेश केला. बेडरुमचे कुलुप तोडले व फ्लॅटमधील 1 लाख 1 हजार 700 रुपये किमतीचे वायरचे बंडल चोरून नेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.