Talegaon Dabhade : गंध the smell नाटक लवकरच रंगभूमीवर

एमपीसी न्यूज- ‘गंध the smell’ नावाचे हिंदी नाटक लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. रंगभूमी मुंबई क्रिएशन्स या नाट्यसंस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. गंध ,वास याच्या विविधांगी छटा या नाटकातून हळुवारपणे उलगडल्या आहेत. तसेच मानवी भावभावनांचा ऊहापोह यात मांडण्यात आला आहे.

मुंबईत अंधेरी येथील क्रियेटींग क्रॅकेर्स रंगमंदिरात 17 मार्च रोजी रात्री 8 वाजता या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर केला जाणार असून 22 मार्च रोजी पुण्यात सुदर्शन रंगमंच येथे प्रयोग होणार आहे. या नाटकाचे लेखन ख्यातनाम लेखक सतीश दवे, समता सागर आणि हर्षल आल्पे यांनी केले आहे. दिग्दर्शन सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक आणि हिंदी रंगभूमी वरील नामवंत दिग्दर्शक मनीष शिर्के यांनी केले आहे. अभिनेते जयंत गाडेकर आणि अभिनेत्री गीतिका श्याम यांच्या मुख्य भूमिका आहेत .या नाटकात पार्श्वगायन पं. विनोदभुषण आल्पे यांनी केले आहे. तर संगीत मनीष शिर्के आणि विजय नंदा यांचे आहे.

मुक्तछंद फाउंडेशनचे आमोद साने आणि ओंकार भोज हे या नाटकाचे प्रायोजक आहेत. रसिकांनी या नाटकाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन निर्मात्यांकडून करण्यात आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.