Pune : हाय इम्पॅक्ट टिचिंग स्किल्स ‘ विषयावर कार्यशाळा

एमपीसी न्यूज- ‘हाय इम्पॅक्ट टिचिंग स्किल्स ‘ विषयावर भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळेंचे आयोजन करण्यात आले होते. डेल कार्नेजी प्रमाणित ट्रेनर यास्मिन इराणी यांनी मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले.

कार्यशाळेत अभियांत्रिकी विद्यालयाच्या सर्व विभागातील प्राध्यापक सहभागी झाले. ‘ अध्यापनात प्रभावी तंत्रांचा वापर, संवाद कौशल्ये,कौशल्यपूर्ण मांडणी, व्यक्तिमत्व विकसन इत्यादी मुद्द्यांवर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

” विद्यार्थ्यांना शिकविताना प्राध्यापकांकडे प्रभावी अध्यापन तंत्र आणि संवाद कौशल्य असली पाहिजेत. अशा कार्यशाळांमधून अध्यापनाची गुणवत्ता वाढण्यास मदत होते” असे प्रतिपादन डॉ. आनंद भालेराव यांनी केले.

यास्मिन इराणी म्हणाल्या, “अध्यापनासह जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संवाद कौशल्ये,कौशल्यपूर्ण मांडणीचा फायदा होतो. त्यामुळे ही कौशल्ये सतत वृद्धिंगत केली पाहिजेत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.