BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : बँकेतून बोलत असल्याचे सांगत क्रेडिट कार्डची माहिती विचारून हजारोंचा गंडा

एमपीसी न्यूज – एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगून तरुणाकडून क्रेडिट कार्डची माहिती घेतली. त्याद्वारे वोडाफोन बिल डेस्क मार्फत 20 हजार रुपये ट्रान्स्फर करून तरुणाची फसवणूक केली. ही घटना वाकड येथे घडली.

तुषार सुभाष शिंदे (वय 31, रा. सद्गुरू कॉलनी, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इस्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात इसमाने तुषार यांना 8 सप्टेंबर 2018 रोजी फोन केला. त्याने एसबीआय क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगून तुषार यांच्याकडून त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती घेतली. त्याआधारे आरोपीने वोडाफोन बिल डेस्क मार्फत 20 हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतले. याबाबत तुषार यांनी सोमवारी (दि. 4) गुन्हा नोंदवला. त्यानुसार अज्ञात आरोपीवर फसवणुकीसह, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like