Sangvi : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून घरच्यांना दिली जीवे मारण्याची धमकी; तरुणाविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – शेजारी राहणा-या तरुणाने घराच्या काचा फोडून घरात प्रवेश करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तसेच मुलीच्या आई-वडील व भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री साडेनऊच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली.

याप्रकरणी 17 वर्षीय मुलीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जॉन्टी जोसेफ पाटोळे (वय 22, रा. ढोरे नगर, जुनी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या शेजारी राहतात. जॉन्टी याने फिर्यादी मुलगी राहत असलेल्या घराच्या खिडकीच्या काचा फोडून घराचा दरवाजा तोडला. घरातील पाण्याचा माठ फोडून मुलीला अश्लील शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. हे भांडण सोडविण्यासाठी मुलीचा भाऊ आणि आजी मध्ये आले असता त्यांनाही शिवीगाळ केली. तसेच मुलीच्या आई-वडील आणि भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.