Pune : ‘शिक्षक गौरव ‘ पुरस्कारांचे लखनौ महापौरांच्या हस्ते वितरण

एमपीसी न्यूज- ‘अवध शिक्षक गौरव ‘ पुरस्कारांचे वितरण लखनौच्या महापौर संयुक्ता भाटिया आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट ‘चे प्राचार्य डॉ . ऋषी आचार्य यांच्या हस्ते करण्यात आले.

लखनौमध्ये झालेल्या अखिल भारतीय कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या 22 प्राचार्यांचा आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला. ‘पी ए इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स ,डिझाईन अँड आर्ट ‘ आणि युनिटी कॉलेज लखनौ यांनी संयुक्तपणे या उपक्रमाचे आयोजन केले. ऋषी आचार्य, नजमूल रिझवी यांनी मार्गदर्शन केले. सईद मेहदी सलीम सर्फानी आणि मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.