Chakan : आय ए सी लिमिटेडच्या निघोजे व चाकण प्रकल्पातील कामगारांना 13,750 ची वेतनवाढ

आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज- चाकण औद्योगिक क्षेत्रातील आय ए सी लिमिटेड निघोजे व आय ए सी लिमिटेड चाकण या दोन्ही कंपनीमध्ये व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यात वेतन वाढीचा करार करण्यात आला. कामगारांना आगामी तीन वर्षांसाठी 13 हजार 750 रुपयांची पगारवाढ देण्यात आली. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी दिली.

या दोन्ही कंपनीतील स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना आणि व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींची गेल्या अनेक दिवसांपासून वेतनवाढ आणि अन्य मागण्यांबाबत चर्चा सुरू होती. आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार (दि.7) कंपनीचे व्यवस्थापन प्रतिनिधी आणि संघटनेच्या पदाधिका-यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी द्विपक्षीय पदाधिकार्यांनी स्वाक्ष-या करुन कराराचे आदन- प्रदान करण्यात आले.

यावेळी सघंटनेचे प्रमुख सल्लागार रोहीदास गाडे, माथाडी कामगार नेते किसनराव बावकर, स्वाभिमानी श्रमिक कामगार सघंटनेचे अध्यक्ष जीवनशेठ येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, उपाध्यक्ष शाम सुळके, चिटणीस रघुनाथ मोरे, सचिव तेजस बिरदवडे, खजिनदार अमृत चौधरी, सोमनाथ जानराव, युनिट अध्यक्ष सचिन लांडगे उपाध्यक्ष विनोद दौडकर, खजिनदार अमित दुधाने, सरचिटणीस प्रवीण गव्हाणे, चिटणीस धनंजय झापर्डे व चाकण प्लॅन्टचे अध्यक्ष उमेश वाडेकर, सरचिटणीस चेतन हुले, खजिनदार गणेश पापरे आदी उपस्थित होते.

व्यवस्थापनाच्या वतीने कपंनीचे मनुष्यबळ विकास संचालक संदीप गोंगले, युनिट १ चे प्रकल्प प्रमुख पवन माळसे, युनिट 2 चे प्रकल्प प्रमुख उदय गोंजारे, मनुष्यबळ विकास व्यवस्थापक अमित काळे, युनिट 2 चे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक स्वप्निल पिसे, कंपनी सचिव पराग ढेरेकर, वित्तीय व्यवस्थापक यादव घुंबरे यांनी स्वाक्ष-या केल्या.

“व्यवस्थापनाकडून अपेक्षा ठेवताना उत्पादन क्षमतेबाबत दिलेला शब्द कामगार आणि संघटनेने पाळला पाहिजे. तसेच, कामगारांसाठी निस्वार्थपणे काम केल्यामुळेच आज इतका चांगला वेतनवाढीचा करार झाला व कामगारांना कायमस्वरुपी नोकरी मिळाली आहे” असे मत आमदार महेश लांडगे यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी कामगारांनी फटाक्याची आतषबाजी करून भांडाऱ्याची उधळण करून आनंद व्यक्त केला संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी प्रास्ताविक केले कृष्णा रोहोकले यांनी आभार मानले.

कामगार-व्यवस्थान करारातील ठळक मुद्दे :

# मरणोत्तर साहाय्य योजना दहा लाख रुपये व सर्व कामगारांचा एक दिवसाच पगार या त्याच्या दोन पट रक्कम कंपनी कामगाराच्या वारसाला देणार
# कामगारांचा तीन लाख रुपयांचा मेडिक्लेम
# ग्रुप अपघात पॉलिसी ग्रॉस पगाराच्या 72 टाईम
# पगारी सुट्या 240 दिवसाला 15 पी एल व पुढे प्रत्येक दहा दिवसाला 1 पी एल व साठवण्याची मर्यादा 50 दिवस
# आजारपणाची रजा 8 दिवस
# नैमित्तिक रजा 8 दिवस
# पगारी रजा 11 दिवस
# पगाराची उचल- दहा हजार रुपये
# ‘ओटी’ दोनपट, पगारी सुट्टीत काम केल्यास दोनपट ‘ओटी’ व एक ‘सीऑफ’
# प्रतिवर्षी दोन गुणवंत कामगार पुरस्कार प्रत्येकी 5000 रुपये
# दिवाळी बोनस : 20 %
# सेवा बक्षीस : पाच वर्षे पूर्ण झालेल्या कामगारास 5000 रुपये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.