प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वाधिक 57 बुथ संवेदनशील

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक 2017 च्या निवडणुकीमध्ये 26 लाख 34 हजार 800 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून या निवडणुकीतून महापालिकेच्या सभागृहात 162 सभासद निवडले जाणार आहे. त्यासाठी 1 हजार 90 उमेदवार रिंगणात आहे. उद्या 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेतली जात असून पुणे पोलिसांकडून 3 हजार 431 बुथपैकी 145 बुथ हे संवेदनशील जाहीर करण्यात आले आहे. त्यापैकी प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वाधिक 57 बुथ संवेदनशील असल्याची माहिती पुणे महापालिका निवडणूक निर्णय अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी दिली.

निवडणूक आयोग आणि पोलीस विभागामार्फत प्रत्येक निवडणुकी वेळी विशेष दक्षता घेतली जाते. यंदा देखील पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात येत आहे. मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर केंद्र प्रमुख 3 हजार 431, मतदान अधिकारी 10 हजार 293, शिपाई 3 हजार 431 असे एकूण 17 हजार 154 अधिकारी – कर्मचारी असणार आहेत.

तसेच या निवडणुकीमध्ये 3 हजार 431 बुथ असून त्यापैकी 145 बुथ हे पोलिसांनी संवेदनशील असल्याचे महापालिकेला कळविले आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वाधिक 57 बुथ संवेदनशील आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासन आणि पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जाणार आहे, अशी माहिती महापालिका निवडणूक निर्णय आधिकाऱ्याकडून देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.