Satara News : सातारा जिल्हय़ात दरड कोसळून 9 जणांचा मृत्यू ; 35 जण बेपत्ता

एमपीसी न्यूज : सातारा जिल्हय़ाच्या पश्चिम भागात अतिवृष्टी सुरू असल्याने संकटाचा पहाड कोसळला आहे. पाटण, वाई, जावळी तालुक्यात डोंगराचा भाग आणि दरडी कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 35 नागरिक बेपत्ता असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या तुकडय़ा दाखल झाल्या आहेत.

पाटण तालुक्यातील मोरणा विभागात असणाऱ्या खालचे आंबेघर येथे रात्रीच्या काळोखात दहा ते बारा घरांवर डोंगराचा भाग कोसळून 14 ते 15 जण गाडले गेले आहेत. मिरगाव येथे डोंगराचा भाग कोसळून त्याखाली 12 लोक बारा तासाहून अधिक काळ गाडले गेले आहेत.

अशीच घटना वाई तालुक्यातील देवरुकवाडी येथे घडली आहे. यामध्ये 29 जण गाडले गेले होते. त्यापैकी 27 जणांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.