Pune : कागदपत्रांचा गैरवापर करून बॅंकेतून परस्पर कर्ज काढून तरुणाची 9 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज -कागदपत्रांचा गैरवापर करून बॅंकेतून परस्पर कर्ज काढून 9 लाखांची फसवणूक केल्याची घटना एका तरुणासोबत घडली. 

याप्रकरणी सचिन शिंदे (वय 26, रा. गोरेगाव, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन याला पैशांची गरज असल्याने त्यांनी त्याबद्दल काही इसमांना सांगितले असता त्या इसमांनी बॅंकेतील मॅनेजरशी सचिनची ओळख करून दिली. त्यानंतर सचिनकडून त्या इसमांनी कागदपत्रे घेऊन त्याच्या नावाचे पुण्यातील बॅंक ऑफ महाराष्ट्रात बचत खाते उघडून सचिनच्या परवानगीशिवाय कागदपत्रांचा गैरवापर करून सचिनच्या नावावर 9 लाखांचे कर्ज काढले व कर्जाची रक्कम त्या इसमांनी त्यांच्या खात्यावर सचिनच्या परवानगीशिवाय जमा करून घेतली व सचिनची 9 लाखांची फसवणूक केली.

याप्रकरणी त्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.