Pune crime news: मिरवणूक काढणे भोवले, गुंड गजा मारणे सह नऊ जणांना अटक तर 200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

9 people arrested along with Gaja Marane, case filed against 200 more.

एमपीसी न्यूज- खूनाच्या दोन गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर मिरवणूक काढणे आणि सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून दहशत पसरवल्या प्रकरणी गुंड गजा मारणे सह त्याच्या आठ साथीदारांना कोथरूड पोलिसांनी अखेर अटक केली. याशिवाय त्याच्या दीडश ते दोनशे साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

गजानन मारणे, प्रदीप दत्तात्रय कंधारे, बापु श्रीमंत बागल, आनंता ज्ञानोबा कदम, गणेश नामदेव हुंडारे, रुपेश कृष्णराव मारणे, सुनील नामदेव बनसोडे, श्रीकांत संभाजी पवार आणि सचिन आप्पा ताकवले या नऊ जणांना कोथरूड पोलिसांनी अटक केली.

_MPC_DIR_MPU_II

त्यांच्याविरोधात भादवि कलम 267, 268, 270, 143, 149 सह डिझास्टर मॅनेजमेंट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर गजा मारणे याने कोथरूड परिसरातील हमराज चौकात बंदी असतानाही समर्थकांची गर्दी जमवून Covid-19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या नियमांचा भंग केला आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा फायदा घेऊन समर्थकांना जमवून गणपतीची आरती करण्यासाठी जमाबंदी कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.